महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
आजपासून बच्चू कडू यांची कर्ज माफीसाठी “सातबारा कोरा” पदयात्रा
अमरावती- प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी पुन्हा आक्रमक झाले आहे. आजपासून बच्चू कडू यांची 7/12 कोरा यात्रा सुरू होत असून सकाळी 11 वाजता स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या अमरावती जिल्ह्यातील ‘पापळ’ या जन्मभूमी पासुन ते यवतमाळ जिल्ह्यातील ‘चिलगव्हाण’ या देशातील पहिली शेतकरी आत्महत्याग्रस्त गावात याचा समारोप होणार आहे. एकूण 7 दिवसाची 138 किलोमीटर पायी पायदळ यात्रा बच्चू कडू काढणार आहे. या सात दिवसाच्या पदयात्रेत बच्चू कडू हे गावागावात शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून सभा देखील घेणार आहेत.




