महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी:सरकारने ‘लाडक्या बहिणींच्या’ योजनेतील अर्जांची छाननी थांबवली

सरकारने ‘लाडक्या बहिणींच्या’ योजनेतील अर्जांची छाननी थांबवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. निवडणुकीपूर्वी जर या योजनेच्या लाभार्थ्यांना अपात्र ठरवले असते, तर त्याचा निवडणुकीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या योजनेचे लाभार्थी दोन कोटी चौतीस लाख इतके आहेत. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर वर्षाला पन्नास हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडत आहे. अर्जांची छाननी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतरच केली जाईल असेही स्पष्ट झाले आहे. हा निर्णय निवडणुकीतील संभाव्य ‘फटका’ टाळण्यासाठी घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे मोठ्या संख्येने लाभार्थ्यांवर तात्पुरता परिणाम होणार नाही.