महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

आयडी घोटाळ्या प्रकरणी भाजपचे माजी खासदाराच्या भावाला अटक; अटकपूर्व जामीन घेण्याची धडपड अयशस्वी

भाजपचे आमदार प्रवीण दटके आणि आमदार संदीप जोशी यांनीच सर्व प्रथम उघडकीस आणला शालार्थ आयडी गैरव्यवहार

नागपूर : – नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळ्या प्रकरणी भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे यांचे भाऊ व माजी शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घोटाळ्यात आतापर्यंत चार अधिकारी, मुख्याध्यापक, शाळा संचालक व कर्मचारी अशा एकूण १८ जणांना अटक केली आहे. मेंढे यांची अनेक दिवसांपासून अटकपूर्व जामीन घेण्यासाठी धडपड सुरू होती. मात्र त्यांना यात यश आले नाही.

शालार्थ आयडी गैरव्यवहार प्रकरणात भाजपचे आमदार प्रवीण दटके आणि आमदार संदीप जोशी यांनीच सर्व प्रथम उघडकीस आणला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याची मागणी केली होती. पावसाळी अधिवेशनातही प्रवीण दटके यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांनी चौकशी स्थापन केली आहे.

दिवंगत शिक्षणाधिकारी यांच्या सोमेश्वर नेताम यांच्या बनावट स्वाक्षरीने नागपूर विभागात शेकडो शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कोव्हीडनंतर सर्वांना नियमित करण्यात आले. त्यांचे शालार्थ आयडी तयार करून एरिअस काढण्यात आला.

तो शिक्षण विभागातील अधिकारी आणि शाला संचालकांनी वाटून घेतला. बनावट शालार्थ आयडीद्वारे नागपूर विभागात तब्बल २७०० शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचे आमदार दटके यांनी विधानसभेत सांगितले होते. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी तीन वेळा समिती स्थापन करण्यात आली होती.

या समितीच्या तीनही अध्यक्षांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोघांना अटकही करण्यात आली आहे. यावर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सुद्धा ही वस्तुस्थिती असल्याचे सांगतले. दटके यांच्या सुचनेनुसार त्यांनी आएसएस आणि आयपीएस सोबतच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची समांतर चौकशी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती.

१९ लोकांवर आतापर्यंत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काहींना अटकसुद्धा करण्यात आली आहे. काहींची अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काटोल विधानसभा मतदरसंघातील दलालांच्या नावांची यादी नागपूरच्या पोलिस आयुक्तांना यापूर्वीच सोपविली आहे. दादा भुसे यांच्याही मतदारसंघात बोगस भरती झाल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button