महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
अंघोळीच्या वेळी 12वर्षीय अल्पवयीनला छेळले:नामकीत गुपचूपवाल्याच्या मुलाला अटक

नागपूर – पाचपांवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने परिसरात राहणा-या 12 वर्षांच्या मुलीला छेडल्याची घटना घडली आहे. ती आंघोळ करीत असताना आरोपी बाथरूममध्ये घसला. पीडितेने कुटुंबीयांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी ‘ गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप आहे. आरोपीचे नाव दिनेश गुप्ता (28) शहरातील नामांकित गुपचूप वाल्याचा मुलगा असून, पीडित मुलगी आठवीत शिकते. तिचे कुटुंब 50 वर्षापासून भाड्याच्या घरात राहत आहे. 2013 मध्ये दिनेशच्या वडिलांनी ते घर विकत घेतले. त्यानंतर पीडितेच्या कुटुबाने त्याच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. घर रिकामे करण्यावरूनही वाद झाला होता. रविवारी सकाळी 10.30 वाजता पीडिता बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेली. काही वेळाने ती रडत परतली आणि कुंटंबाला सर्व प्रकार सांगितला.