बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया नागपूर व बुटीबोरी पदग्रहण संपन्न
नागपूरचे विलास हरडे अध्यक्षपदी तर बुटीबुरीचे नितीन साळवे

नुकताच बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया यांची नागपूर प्रभाग आणि बुटीबोरी प्रभाग यांच्या पदाधिकारीचा पदग्रहण समारंभ पार पडला. या समारंभात नागपूर प्रभागाचे विलास हरडे आणि बुटीबोरी प्रभागाचे नितीन साळवे यांनी अध्यक्षपदाच्या भार सांभाळला.
ह्या पदग्रहण समारंभाचे मुख्य अतिथी के.चंद्रशेखरराव, उपाध्यक्ष बीएआय वेस्ट झोन हे उपस्थित होते. जगन्नाथ राव यांच्या हस्ते पदग्रहण करण्यात आले कार्यक्रमाला राजाकुमार नायर आणि राजेंद्र आठवले यांचेही योगदान लाभले ह्या समारंभात बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर यांना येणारा अडचणीवर चर्चा करण्यात आली त्यात असे ठरविण्यात आले की,
१) जीएसटी ची रेंज वाढविण्यात यावी जी आज 45 लाख आहे ती 60 लाख रुपयापर्यंत करण्यासाठी वित्त मंत्रालय भारत सरकार यांच्याकडे पाठपुरवठा करण्यात येईल जेणेकरून सामान्य माणसाला फ्लॅट घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल.
२) नागपूर सुधार प्रन्यास ने एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) लागू केले आहे ते कोर्टाच्या निर्णयानुसार रद्द करण्यात यावे त्यासाठी श्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई, एकनाथ शिंदे उप -मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई व चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री मुंबई यांच्याकडे पाठपुरवठा करण्यात येईल.
३) सरकारी कॉन्ट्रॅक्टर यांचे थांबलेले बिल त्वरित काढण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाठपुरवठा करून त्वरित थांबलेले बिल काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
४) सिमेंट आणि रेतीचे भाव कमी करण्यासाठी सरकार बरोबर संपूर्ण बिल्डर असोशियन बोलणी करून शासनावर दबाव आणेल, ज्यामुळे लोकांचे घर घेण्यासाठी स्वप्न साकार होईल.
५) पर्यावरणासाठी असोसिएशन कडून सेमिनार घेण्यात येईल व प्रत्येक सदस्यांना संपूर्ण माहिती देण्यात येईल.
६) ग्रीन बिल्डिंग साठी सेमिनार घेण्यात येईल.
याप्रसंगी पदग्रहण समारंभला सुधीर पालीवाल, पी.एन.हरडे, प्रदीप नागरे, अभिमन्यू चावला, मनोज ढोबळे, प्रमोद बाराई, सुधाकर बैतुले, विनीत माडगे, राम वंजारी, सौरभ आठवले, राम सहानी व इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी द्वारे विलास हरडे यांना दिली.