महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

बस स्टँडवर अर्धनग्न मानसिक रूग्णाचा धिंगाणा, 45 मिनिटांचा थरार… पोलिस आणि ‘हितज्योती’ संस्थेच्या मदतीने नियंत्रणात

सावनेर |दि. 23 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास सावनेर एसटी बस स्थानकात एका 28 वर्षीय मनोरुग्णाने अर्धवस्त्र अवस्थेत धिंगाणा घालत प्रवाशांना त्रास देण्याचा प्रकार घडला. बसच्या खिडक्या, दरवाज्यांवर लटकत तो अनाकलनीय वर्तन करत होता. त्याला रोखण्याचा प्रयत्न होताच, तो अधिक आक्रमक झाला, ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

 

ही माहिती मिळताच हितज्योती आधार फाऊंडेशनचे हितेश बनसोड यांनी तात्काळ सावनेर पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक राजेश तिवारी, मिलिंद मोरे, तसेच फाऊंडेशनचे तुषार महाले, राजा फुले आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने संबंधित मनोरुग्णाला समजावत शांत करून अखेर नियंत्रणात आणण्यात यश आले.

यानंतर त्याला तत्काळ मेयो हॉस्पिटल, नागपूर येथे प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. सध्या त्याला नागपूर येथील मनोरुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्याची ओळख नरसिंगपूरचे रहिवासी निरज अशी झाली असून, त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे.

 

प्रत्यक्षदर्शींच्या मते, या मानसिक रुग्णाला काबूत आणणे ही अत्यंत आव्हानात्मक बाब होती. मात्र, पोलिस आणि फाउंडेशनच्या प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button