महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
चंद्रपुरात ख्रिश्चन समाजाचा मोर्चा, आमदार पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध

चंद्रपूर :- ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज, गुरुवार 3 जुलै रोजी चंद्रपूर शहरात ख्रिश्चन समाजाच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा चंद्रपूर जिल्हा पास्टर्स असोसिएशनच्या पुढाकाराने काढण्यात आला.
17 जून रोजी आमदार पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी केलेल्या विधानामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून, धार्मिक तेढ निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. जयंत टॉकीजजवळील सेंट अँड्रिया चर्च येथून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला. या शांततापूर्ण मोर्चात महिलांसह पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.