डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर येथे २२ जुलै रोजी तक्रार निवारण जन सुनावणी

नागपूर:- उत्तर नागपूरातील अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. या समुदायाच्या तक्रारींचे थेट निवारण करून न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगातर्फे २२ जुलै २०२५ रोजी “तक्रार निवारण जन सुनावणी परिषद” आयोजित करण्यात आली आहे.
ही परिषद सकाळी १०:३० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर, इंदोरा चौक, नागपूर येथे होणार आहे. आयोगाचे उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी स्वीकारतील. यावेळी राज्य शासनातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहतील.
आयोगाचे उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी शहर व महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांना तक्रारींसह या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.