महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
दीक्षाभूमीच्या विकासकामांना सुरुवात कधी होणार?भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा सवाल
धम्मचक्र प्रवर्तनदिनाला केवळ अडीच महिने

नागपूर – जगभरातील कोट्यवधी अनुयायांचे प्रेरणास्थान असलेल्या पवित्र दीक्षाभूमीच्या विकास कामांसाठी राज्य शासनाकडून 200 कोटी रुपये मंजूर झाले. मात्र अद्यापही कामाला सुरुवात झाली नाही. तांत्रिक कारणामुळे आठ महिन्यांपासून काम बंद आहे. धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्याला केवळ अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे दीक्षाभूमीवरील विकासकामे तत्काळ पूर्ण करावीत, अशी अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून दीक्षाभूमीच्या विकासकामांकडे लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा विकासकामांना सुरुवात करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासला पत्र पाठविल्याचे ससाई म्हणाले.