Uncategorized

धावत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या महिलेचा पाय घसरला, आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

नागपूर – नागपूर रेल्वे स्थानकावर सोमवारी सायंकाळी एक हृदयधडक घटना घडली, जिथे एका महिलेला धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात आपला जीव गमवावा लागला असता, पण आरपीएफच्या जवानाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे ती मोठ्या दुर्घटनेपासून वाचली.

 

घटना सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर घडली. १२१३६ नागपूर-पुणे एक्सप्रेस रेल्वे स्थानक सोडत असताना, एक महिला प्रवासी पायऱ्यांवरून धावत आली आणि ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू लागली. त्या घाईगडबडीत तिचा पाय घसरला आणि ती ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या मधोमध पडण्याच्या स्थितीत होती.

 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, रेल्वे सुरक्षा बलाचे (RPF) काँस्टेबल धीरज दलाल यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ धाव घेतली आणि महिलेला खेचून सुरक्षित ठिकाणी आणले. त्यांच्या या धाडसामुळे महिलेला नवा जन्म मिळाला.

 

बचावल्यानंतर संबंधित महिलेनं आरपीएफ आणि विशेषतः जवान धीरज दलाल यांचे आभार मानले. तिने सांगितले की, “जर वेळेवर मदत मिळाली नसती, तर मोठी दुर्घटना घडली असती.”

 

रेल्वे प्रशासनाने देखील धीरज दलाल यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना “आदर्श जवान” असे गौरवले आहे. ही घटना “ऑपरेशन जीवन रक्षक” या आरपीएफच्या उपक्रमाअंतर्गत घडलेली असून, हा आणखी एक यशस्वी प्रयत्न ठरला आहे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button