धक्कादायक! कुत्र्याला घाबरून पळालेल्या मुलाचा इमारतीवरून पडून मृत्यू
कुत्र्याला घाबरून मृत्यूच्या खाईत!
कुत्र्याला घाबरून पळत असताना तोल जाकन खाली पडल्याने एका 12 वर्षीय मुलाचा गंभीर जखमी होऊन दुदैवी मृत्यू झाला.ही हदयद्रावक घटना कळमना पोलिस ठाण्यातर्गत घडली. जयेश रवीद्र बोकडे रा. देव हाईट्स, प्रभासूपी पावणगाव असे मृत मुलाचे नाव आहे, जयेश सहाव्या वर्गात शिकत होता. रविवारी दुपारी जयेश अपार्टमेंटखाली सोसायटीत राहणाऱ्या 4 मित्रांसोबत खेळत होता. काही वेळानंतर तीन मित्र जेवण करण्यासाठी आप-आपल्या घरी गेले. सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास जयेश शेजारी राहणाऱ्या मुलासोबत तेथेच खेळत होता. या दरम्यन एक मोकाट कुत्रा भुंकत त्याच्या दिशेने धावला. यामुळे घाबरलल्या जयेशने तेथुन पळ काढला तो इमारतीत शिरला. कूत्राही त्याच्या मागे भुकंत इमारतीत शिरलाः जयेश धावत-धावत इमारतीचा जीना चढत होता. पाचव्या माळ्यावरुन सहाव्या माळ्यावर जात असताना थकल्यामुळे तो जीन्याच्या व्हेंटिलेशन खिडकीजवळ थांबला. त्याच वेळी कुत्राचा भुंकण्याचा आवाज आला. यामुळे आधीच घाबरलेल्या अवस्थेत असलेला जयेश दचकला आणि त्याचा तोल गेला व्हेंटिलेशन खीडकीतून तो थेट खाली पडला. काहीतरी पडल्याचा आवाज ऐकून कुटुबीय आणि शेजारी घरातून बाहेर आले. जयेश रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता. तात्काळ त्याला उपचारार्थ जवळच्या रुग्णालयात दाखल करपयात आले. प्रकृती नाजूक असल्यामुळे डॉक्टरने त्याला मेयो रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला.मेयो रुग्णालयात डॉक्टरांने त्याला तपासून मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे


