१० दिवसांनंतर नागपूरकरांवर पावसाची कृपा; जोरदार सरींनी दिला दिलासा!

अखेर नागपूरकरांची प्रतीक्षा संपली! तब्बल १० दिवसांच्या विश्रांतीनंतर आज शहरात सुमारे १ ते १.३० तास जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती. चार-पाच दिवसांपासून आकाशात ढगांचा लपंडाव सुरू होता, मात्र पावसाचे काही ठोस चिन्ह नव्हते.
मात्र आज दुपारनंतर अचानक आकाश काळवंडले आणि काही वेळातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे तापमानात घसरण झाली शहरातील अनेक भागांमध्ये रस्ते ओलांडताना नागरिकांना अडचणी आल्या, काही भागांत साचलेले पाणी पाहायला मिळाले, परंतु अनेकांनी या पावसाचे स्वागतच केले. सोशल मीडियावरही ‘नागपूरला पावसाची भेट’ अशी प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.
मौसम विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांमध्ये पावसाच्या सरी सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.असून, उकाड्याने त्रस्त असलेल्या नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.