ड्रग्जला प्रोत्साहन देणाऱ्या चित्रपटांवर बंदो घाला:आमदार डॉ.फुके यांची परिषदेत मागणी
कारवाई करण्याचे मुख्यमत्र्यांचे आश्वासन

समाजात वाढत चाललेल्या अमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेचा धोका लक्षात घेता, ड्रग्स व इतर अमली पदर्थांचे अप्रत्यक्ष किंवा थेट प्रमोशन करणाऱ्या चित्रपट व वेबसीरिजवर बंदी आणावी, अशी मागणी विधानपरिषदेत आमदार डॉ. परिणय फुके यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. आजच्या तरुण पिढीवर सोशल मीडिया, वेबसीरिज आणि चित्रपटांचा मोठा प्रभाव आहे. या माध्यमांमधून अनेकदा ड्रग्जच्या सेवनाचे चित्रीकरण अगदी आकर्षक पद्धतीने केले जाते.
चित्पटांमध्ये ड्रग्स सेवन करणाऱ्या व्याक्तरेखा कूल म्हणून दाखवल्या जातात. त्यामुळे तरुण वर्ग नकळत अशा वाईट सवयीच्या आहारी जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. अशा प्रकारच्या कंटेंटवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर नियमावली तयार करावी, अशी शिफारसही डॉ. फुके यांनी केली
कारवाई करण्याचे मुख्यमत्र्यांचे आश्वासन
याबाबत काय उपायोजना राबविण्यात येतील यासाठी सरकार नक्कीच प्रयत्नशील राहील. ‘तसेच अशा प्रकारच्या कन्टेन्ट तयार करणाऱ्या निर्मात्यांशी संवाद तसेच राज्याचे सांस्कृतिक मंत्रालय आणि माहिती व जनसंपर्क विभागाशी समन्वय साधला जाईल, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी दिली