महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
गंगा-जमुना परिसरातून पाच अल्पवयीनांसह आठ मुलींची सुटका; देहव्यापार प्रकरणी महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर – शहरातील गंगा-जमुना परिसरातून देहव्यापारात अडकविण्यात आलेल्या पाच अल्पवयीन मुलींसह आठ मुलींची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई 20 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सामाजिक सुरक्षा विभागाने गुप्त माहितीच्या आधारे केली.
ही कारवाई लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. तपासात असे उघड झाले की, आरोपी महिला सुनिता कर्मावत ही बाहेर राज्यातून मुलींना बोलावून त्यांना जबरदस्तीने देहव्यापारात ढकलत होती. घटनास्थळावर पोलिसांनी छापा टाकून सर्व मुलींची सुटका केली आहे.
या प्रकरणी सुनिता कर्मावत विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, लकडगंज पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे. या प्रकारामुळे गंगा-जमुना परिसरातील देहव्यापारावर मोठा आघात झाला आहे.