घराजवळील खड्ड्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू,रामटेक तालुक्यातील पाचगाव खैरी बीजेवाडा येथील घटना

नागपूर :- जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या रामटेक तालुक्यातील खैरी बिजेवाडा ग्रामपंचायत हद्दीतील पाचगाव येथे शनिवारी एक अत्यंत दुर्दैवी आणि मन पिळवून टाकणारी घटना घडली आहे. शाळेतून सुट्टी झाल्यानंतर खेळण्यासाठी गेलेल्या दोन सहा वर्षीय मुलांचा खोल खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 26 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, खैरी बिजेवाडा पाचगाव येथील रहिवासी उत्कर्ष लोकेश लांजेवार वय 7 वर्ष व रिधान संजय सहारे वय 7 वर्ष हे दोघेही दुपारी दोन वाजताच्या सुमारास शाळेतून घरी परतले. जेवण केल्यानंतर खेळायला घराबाहेर गेले असता घराजवळूनच काही अंतरावर असलेल्या एका खड्ड्याजवळ ते पोहोचले. दिवसभर पाण्याची रीप रीप सुरूच होती,खड्ड्यात पाणी असल्याचे पाहून खेळण्यासाठी आले आणि ते थेट स्वतःच्या पायातील चप्पल बाहेर काढून खड्ड्यात उतरले मात्र खड्डा खोल असल्याने त्या दोन्ही मुलांना पाण्याचा अंदाज लागला नाही आणि यातच बुडून मरण पावलेत.
खेळायला गेले असताना अजूनही मुले घरी परतले नाहीत म्हणून शोधाशोध घेतली असता घराजवळच घराजवळूनच काही अंतरावर असलेल्या खड्ड्याच्या वर पोहोचले असता खड्ड्याच्या खड्ड्याजवळ दोन्ही मुलांच्या चपला दिसून आल्या एकाने खड्ड्यात उतरून पाहिले असता पाण्याखाली एक मुलगा आढळून आला तर आणखी शोध घेतले असता दुसऱ्या मुलाचा मृतदेह पाण्याखाली दिसून येताच घरच्यांनी हंबरडा भोडला
दोन्ही मुलांचे मृतदेह एकाच खड्ड्यात मिळून आल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात होती तर मुलांच्या आई-वडिलांच्या पायाखालून जणू जमीनच घसरली गेली असे त्यावेळचे दृश्य होते.
संपूर्ण घटनेची माहिती रामटेक पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी दोन्ही मृतकाला शवविच्छेदन करण्याकरिता रामटेक उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले उत्तरे तपासणी केल्यानंतर मृतदेह दोन्ही कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार आले