गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस: वाहतुकीवर परिणाम – अनेक रस्ते बंद
पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडण्याचा प्रशासनाचा निर्णय
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मोर पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता वाढली असून, काही प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
वाहतुकीवर परिणाम – अनेक रस्ते बंद
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत:
बोरी ते मांडोखाल
कोरंबी टोला ते मांडोखाल
सिलेझरी ते येरंडी (विहीरगाव)म
हागाव, शिरोली, ईटखेडा मार्ग
तसेच बोंडगाव/देवी ते खांबी आणि चान्ना ते बोंडगाव/देवी हे मार्ग लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना गरजेशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. परिस्थितीवर प्रशासनाचे नियंत्रण असून, सतत निरीक्षण ठेवले जात आहे.
पुजारीटोला धरणात पाण्याची वाढ – येलो अलर्ट जारी
पावसामुळे पुजारीटोला धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे धरण सुरक्षीत व नियंत्रणात राहावे यासाठी ८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता धरणाचे चार दरवाजे प्रत्येकी ०.३० मीटरने उघडण्यात येणार आहेत.नदीपात्राजवळ जाणे टाळा, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

