महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
गोंडखैरीत प्रहारचं आक्रमक आंदोलन! स्वर्गरथ जाळून सरकारचा निषेध

नागपूर – नागपूरच्या गोंडखैरी परिसरात प्रहार संघटनेने आज तीव्र आंदोलन करत थेट अंत्यसंस्कारासाठी वापरल्या जाणाऱ्या स्वर्गरथला आग लावल्याने एकच खळबळ उडाली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांगांच्या विविध मागण्यांवरून राज्यभरात प्रहार संघटनेच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले होते.
नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासूनच आंदोलनाची तीव्र तयारी सुरू होती. काही पदाधिकाऱ्यांची रात्रीच अटक करण्यात आली, तरी आंदोलकांनी माघार घेतली नाही. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असतानाही आंदोलकांनी स्वर्गरथ जाळत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
हे आंदोलन बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येत असून शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात प्रहारचा लढा अधिक आक्रमक होतो आहे.