हॉटेल पॅराडाइजमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; रशियन महिलेची सुटका, एका महिलेला अटक

नागपूर :- शहरातील हॉटेल पॅराडाइजमध्ये सुरू असलेल्या कथित सेक्स रॅकेटवर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (SSB) मोठी कारवाई केली. या धाडीत पोलिसांनी एका रशियन महिलेची सुटका केली असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई 2 जुलै रोजी संध्याकाळी 5.30 वाजता सुरू होऊन 3 जुलैच्या पहाटे 1.55 वाजेपर्यंत चालली. संबंधित रॅकेट हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील रूम क्रमांक 403 मध्ये सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे.या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात भारतीय न्यायदंड संहिता (BNS) कलम 143 (2) (3) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा 1956 (PITA) अंतर्गत कलम 3, 4 आणि 5 नुसार गुन्हा क्रमांक 449/2025 असा नोंदवण्यात आला
रश्मी आनंद खत्री (वय 49), रा. प्लॉट नं. 65, गोविंदगड, शांतिनिकेतन कॉलेजजवळ, उप्पलवाडी, कंठी रोड, नागपूर हिला अटक करण्यात आली असून, कायदेशीर प्रक्रियेअंती तिला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे
या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कृष्णकुमार ऊर्फ राधे देशराज हा अद्याप फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत