इंस्टाग्रामवर मैत्री, मनीषनगरात गाडीत नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; टॅक्सी ड्रायव्हर अटकेत

नागपूर – शहरातील मनीषनगर परिसरात अल्पवयीन मुलीवर चारचाकी गाडीत जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात चंदन (वय २६) राहणार कोंढाली या युवकाला पोलिसांनी अटक केली असून तो टॅक्सी ड्रायव्हर आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी यांची ओळख एका लग्नसमारंभात झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये इंस्टाग्रामवर मैत्री झाली. मैत्रीचा गैरफायदा घेत आरोपीने पीडितेला धमकी देत म्हणाले, “तु सोबत चल नाहीतर उचलून घेईन,” अशा शब्दांत दबाव टाकत तिला मनीषनगर परिसरात चारचाकी वाहनात नेले.
तेथेच गाडीतच आरोपीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपी चंदनला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे सोशल मीडियावरून ओळखी आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पालकांनी सावध राहण्याची गरज असल्याचे पोलिसांचे आवाहन आहे.