IVF प्रक्रियेतील दुर्लक्षाने 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू; कामठीच्या निकिताच्या मृत्यूने उघड केली वैद्यकीय अनियमितता

नागपूर :- कामठी येथील 23 वर्षीय निकिता विशाल डोंगरे हिचा संशयास्पद मृत्यू IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन) प्रक्रियेदरम्यान झाल्यामुळे मोठा गदारोळ उडाला आहे. निकिताच्या कुटुंबीयांनी इंदिरा IVF हॉस्पिटल, सदर येथील डॉक्टरांवर आणि संबंधित दलालांवर गंभीर आरोप केले असून, ही अंडाणु (एग डोनेशन) प्रक्रिया तिच्या कुटुंबाच्या संमतीशिवाय केल्याचा दावा करण्यात आला आहे.
काय घडलं नेमकं?
परिवारानुसार, बादल आणि प्रियंका देशभ्रतार या दोघांनी पैशांचे आमिष दाखवून निकिताला अंडाणु दानासाठी तयार केलं. 16 जुलैपासून 27 जुलैपर्यंत ही वैद्यकीय प्रक्रिया चालली. मात्र, 27 जुलै रोजी अंडाणु काढताना तिची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर तिला इंदिरा IVF हॉस्पिटलमधून मेडिटेरिना रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान 29 जुलै रोजी सकाळी तिचा मृत्यू झाला.
न्यायासाठी थेट पोलिस स्टेशनवर धडक:
निकिताचा पती विशाल डोंगरे, कुटुंबीय आणि काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे वसीम खान यांनी मिळून मृतदेहासह थेट सदर पोलिस ठाण्यात धडक दिली. त्यांनी इंदिरा हॉस्पिटल आणि बादल-प्रियंका देशभ्रतार यांच्यावर एफआयआर दाखल करून अटकेची मागणी केली आहे. घटनेनंतर दोघेही फरार असल्याचं समजतं.
पोलिस तपास सुरू:
पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून निष्पक्ष तपासाचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, IVF प्रक्रियेतील सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली, अंडाणु दान प्रक्रियेतील वैद्यकीय माहिती न देणं, विना-संमतीची वैद्यकीय介तक्रिया हे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.