महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
जरीपटका ठाणे हद्दीत मध्यरात्री खळबळजनक खून!
स्वप्निल गोसावी यांची दगडाने ठेचून हत्या

नागपूर: नारा गावातील मराठा हॉटेलसमोर सोमवारी रात्री उशिरा खळबळजनक प्रकार घडला. स्वप्निल गोसावी (रा. हुडको कॉलनी, जरिपटका) यांचा अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून निर्घृण खून केला.
ही घटना समजताच जरिपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत डीपी क्राईम टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
स्वप्निल गोसावी हे मृतक जरिपटका पोलीस ठाण्याच्या अगदी शेजारील हुडको कॉलनीत राहणारे होते. खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस विविध कोनातून तपास करत आहेत.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.