महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

कर्जामुळे नैराश्यातून तरुणाची नदीत उडी, पोलिसांच्या तत्परतेने वाचला जीव

पत्नीला म्हणाला, पोरांना सांभाळ

तणावातुन त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. नदीच्या काठाचर पोहोचून पत्नीला फोन केला पोराना सांभाळ, मी आत्महत्या करीत आहे, असे म्हणत नदीच्या पात्रात उडी घेतली. मात्र वेळीच तेथे पोहोचलेल्या पोलिस आणि गावकच्यांनी त्याला पाण्यातून बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले, ही घटना सोमवारी मौदा पोलिस ठाण्यांतर्गत घडली. पंकज राजेंद्र खोब्रागडे (33 ) रा. द्रगधामणा, वाडी असे या व्यक्तीचे नाव आहे. पंकज विवाहित असून 6 वर्षाची मुलगीही आहे, तो आई-वडिलांसोबत वाडी परिसरात राहतो. त्याचा गादी तयार करण्याचा कारखाना आहे. त्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. या व्यवसायासोबतच त्याने कर्ज घेवून त्याने 12 लाख रुपये किंमतीचे (जुने ) जेसीबी घेतले. बँकेचा हप्ता 35 हजार रुपये होता. सुरूवातीला त्याने नियमित कर्जाचे हप्ते भरले. मात्र, अलिकडे काम मिळत नसल्याने बँकेचे हप्ते थकले. हप्ता भरण्यासाठी दुसरा कुठलाच मार्ग त्याच्याकडे नव्हता. त्यामुळे तो तणावात राहू लागला,

ठाण्यातील सायवरचे पोलिस शिपाई सौरभ कारंडे यांनी तात्काल त्याचे मोबाईल लोकेशन शोधले, मौदा हद्दीत नदी जवळ लोकेशन मिळाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश तटकरे यांनी लगेच एएसआय विनोद कांळे यांना मौद्याकडे रवाना केले ततपूवी मौदा पोलिस आणि स्थानिक नागरिकांना लक्ष ठेवण्यास सांगितले. तसेच पंकजला फोनवर गुंतवन ठेवण्यास त्याच्या पत्नीला सांगण्यात आले. स्थानिक’ पोलिस आणि गावातील काही युवक पंकजने पाण्यात उडी घेतली. त्याच्या मागेच उडी घेवून त्याला बाहेर काढले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button