महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
माजी नगरसेवकाचा मुलगा संकेत भुगेवार याला MD Drugs तस्करी प्रकरणी अटक

नागपूरमध्ये एका मोठ्या ब्रेकिंग बातमीनुसार, माजी नगरसेवक अजय भुगेवार यांचा मुलगा संकेत भुगेवार याला MD Drugs तस्करी प्रकरणी अटक माजी नगरसेवक अजय भुगेवार यांचा मुलगा संकेत भुगेवार याला MD Drugs तस्करी प्रकरणी अटककरण्यात आली आहे. संकेत भुगेवार हा स्वतः एक बॉडीबिल्डर आणि जिम ट्रेनर आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये दिल्ली येथे झालेल्या बॉडीबिल्डिंग फिटनेस चॅम्पियनशीपमध्ये त्याने सुवर्ण पदक पटकावले होते आणि त्याला मिस्टर इंडिया हा किताबही मिळाला होता. जिममध्ये व्यायाम करणाऱ्यांना तो व्हिटमिन सप्लीमेंट्सची विक्री करत असे. मात्र, तो MD Drugs च्या तस्करीमध्ये कसा वळला, याबाबत आता सखोल चौकशी सुरू आहे. भाजपचे माजी नगरसेवक अजय भुगेवार यांच्या मुलाच्या अटकेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी पोलीस करत आहेत.