महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्ती घुसला वाघाच्या पिंजऱ्यात:पोलिसांनी सुखरूप काढले बाहेर

नागपूर :- महाराजबाग प्राणीसंग्रहालयात गुरुवारी सकाळी मोठा गोंधळ उडाला, जेव्हा करण सोमकुवर नावाच्या मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्तीने वाघांच्या पिंजऱ्यात प्रवेश केला. घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांनी तातडीने कारवाई करून त्याला सुखरूप बाहेर काढले.
प्राणीसंग्रहालयातील कर्मचारी हरिभाऊ तिरमले यांनी ही घटना पाहून तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळवले. डॉ. सुनील बावस्कर यांच्या माध्यमातून पोलिसांपर्यंत माहिती पोहोचली आणि त्यांनी सोमकुवरला ताब्यात घेतले. चौकशीत तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे समोर आले असून, त्याच्या भावाशी संपर्क साधण्यात आला आहे. तो नागपूरला आल्यावर सोमकुवरला त्याच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.