महफील स्मोक शॉपवर बर्डी पोलिसांची धाड : ई-सिगारेटसह 3.36 लाखांचा माल जप्त

नागपूर :- गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक (एनडीपीएस )ने सीताबर्डी’ ठाण्यांतर्गत गस्तीदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्कसमोरील महफील स्मोक शॉपवर धाड टाकली.
कारवाईदरम्यान तेथे मोठ्या प्रमाणात शासनाकडून प्रतिबंधित ई- सिगारेट, हुक्का पॉट व इतर साहित्यांचा साठा मिळाला. शॉप संचालक स्वतःच्या फायद्यकरिता ग्राहकांना “त्यांची विक्री करीत होते., पोलिसांनी दोघांविरुद्धही गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. वैभव विकास कांबळे (27) आणि शुभम विकास कांबळे (31) दोन्ही रा. बाबा बुद्टाजीनगर, पाचपावली अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मंगळवारी रात्री 6 वाजताच्या सुमारास एनडीपीएस पथक धरमपेठ परिसरात गस्त घालत होते. या दरम्यान चिल्ड्रन्स ट्रॉफीक पर्कसमोरील महफील स्मोक शॉपमधून ग्राहकांना शासनाकडून प्रतिबंधित” ईं- सिगारेट, हुकका पॉट’व इतर साहित्यांची विक्री करण्यात येत असल्याची माहिती पथकाला मिळाली.
आरोपी शॉपमध्ये येणाऱ्या ग्राहकांना प्रतिबंधित वस्तूंची विक्री करताना आढळले.. पोलिसांनी शॉपमधून 17 वेब ईं-सिगारेटीची पाकिटे, 17 पाकिंटे प्रतिबंधित विदेशी सिगारेट, हुकका पॉट्स, पाईप, विविध फ्लेन्हरचा तंबाखू, दुचाकी, चार’ मोबाईल फोन, डीव्हीआर सिस्टम आणि रोखअसा एकूण 3 लाख 36 हजार 70 रुपयाचा माल जप्त केला. शॉप संचालक कांबळे बंधूविरुद्ध ईले्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4,5,7 आणि 8 तसेच सिगारेट ” आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा (कोटपा ) च्या विविध कलमान्वये सीताबर्डी ठाण्यात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. दोघांनाही मालासह सीताबरडीं पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.