महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
नागपूर – मध्य विक्रीवर दहा टक्के व्हॅट टॅक्सच्या, निषेधार्थ परमिट रूम बार असोसिएशनच्या वतीने बार बंद
संविधान चौक ते जिल्हा दंडाधिकाऱ्यांपर्यंत निषेध रॅली

नागपूर – परमिट रूम आणि बिअर बार व्यवसायिकांवर शासनाने लादलेल्या अन्यायकारक व्हॅट करवाढी विरोधात आज जिल्हाभरातील परमिट रूम धारकांनी आपले हॉटेल्स आणि बार बंद ठेवत तीव्र निषेध व्यक्त केला.परमिट रूम बार असोसिएशनच्या वतीने नागपूर शहरात संविधान चौक ते जिल्हा दंडाधिकाऱ्यांपर्यंत निषेध रॅली काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने व्यवसायिक सहभागी झाले.
परमिट रूममधील मद्य विक्रीवर १० टक्क्यांनी वाढवलेला व्हॅट (VAT) रद्द करण्यात यावा, अशी मागणी आहे. तसेच, शासनाने ‘फर्स्ट पॉईंट टॅक्स’ लागू करावा आणि परमिट रूम नूतनीकरणाची वाढवलेली फी कमी करावी, असा ठाम आग्रह आंदोलकांनी धरला. या वाढीमुळे परवानाधारकांना मोठा आर्थिक फटका बसत असून ग्राहकांवरही अतिरिक्त दराचा भार येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.