महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
नागपूरच्या तिरंगा चौकात चहा दुकानात भीषण आग!

नागपूर | तिरंगा चौक परिसरात असलेल्या एका चहा दुकानात अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दुकानाजवळच असलेल्या ‘निवार डेंटल क्लिनिक’ जवळून ही आग पसरताना दिसली असून, घटनेनंतर परिसरात धुराचे लोट पसरले. ही घटना आज दुपारी उघडकीस आली.
सुदैवाने, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली असून, वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलीस आणि अग्निशमन अधिकारी परिस्थिती हाताळत आहेत.