नागपुरात चोरीचे दोन गुन्हे उघडकीस, राणापतापनगर पोलिसांची मोठी कामगिरी
चोरीप्रकरणी दोघांना अटक, चांदीचे दागिने आणि केटीएम दुचाकी जप्त

नागपूर – राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावला असून, एकूण १ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पहिल्या प्रकरणात भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करत चांदीची इत्र बाटली, चांदीचे कटोरे, निरंजन, हलदी-कुंकू होल्डर, अगरबत्ती स्टँड, पंचमुखी देवमूर्ती, टायटन आणि सोनाटा कंपनीच्या घड्याळांसह ४६० ग्रॅम चांदी असा अंदाजे ₹27,500 किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला.
दुसऱ्या प्रकरणात पोलीसांनी बजाज केटीएम 200 ड्यूक ही दुचाकी जप्त केली असून तिची अंदाजित किंमत ₹95,000 आहे. या प्रकरणात दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये २६ वर्षीय सोनगावचा राहिवासी राहुल बाबाराव लोंढे आणि २१ वर्षीय भीमनगरचा दीपक महेश बागडे यांचा समावेश आहे.
पोलीसांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त खबरदारीच्या आधारे या दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेला माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास राणाप्रतापनगर पोलीस करीत आहेत.