नागपुरात मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा; अनैतिक देहव्यवसायाचा भांडफोड, चार महिलांची सुटका

नागपूर – शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सीताबर्डी परिसरात कारवाई करत अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. टुरिस्ट प्लाझा बिल्डिंगमधील मेट्रो स्पा हेल्थ अँड वेलनेस सेंटर (युनिसेक्स) येथे पिटा कायद्यांतर्गत छापा टाकण्यात आला. या कारवाईत चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, एक महिलेला आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई 14 जुलै 2025 रोजी सायंकाळी 4:21 वाजल्यापासून ते रात्री 8:47 वाजेपर्यंत सुरू होती. विशेष म्हणजे हे स्पा सेंटर अनुभव टेक्निकल इन्स्टिट्यूटजवळ, वर्दळीच्या परिसरात चालवले जात होते.
आरती अक्षय मरसकोल्हे (वय 30), रा. गोपाल नगर, नागपूर अस महिला आरोपीच नाव असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे
या कारवाईत DVR (₹3,000),Vivo व iPhone मोबाईल (एकूण ₹32,000),रोकड ₹2,500,कंडोम पॅकेट, व इतर साहित्य एकूण अंदाजे किंमत ₹37,730 पोलिसांनी जप्त केला आहे
पोलिसांनी रेड कारवाईदरम्यान मिळालेल्या आरोपी व पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून सर्व कागदपत्रांसह त्यांना सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास सुरू आहे.