महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
नागपुरात वाहनचोरी रॅकेट उघडकीस; पोलिसांनी २४ गाड्या आणि ई-रिक्शा जप्त केल्या

नागपूर : – शहरात वाहनचोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. एका नागरिकाच्या ई-रिक्शा चोरीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला. तपासादरम्यान आरोपीने नागपूर शहरातून २४ वाहनं आणि १ ई-रिक्शा चोरी केल्याची कबुली दिली.
तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली. चौकशीत त्याच्याकडून २३ दुचाकी, चारचाकी आणि एक ई-रिक्शा असा सुमारे १२ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आणखी एक वाहन आर्णी पोलिस ठाण्यात जमा असल्याचे उघड झाले आहे.
या यशस्वी कारवाईमुळे १५ वाहनचोरीच्या प्रकरणांचा उलगडा झाला आहे. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टीमने ही कारवाई केली.