नागपुरात विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून
व्यवसाय सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

नागपूर: महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार आहे. गुरुवारी मुंबईतील विधानसभेच्या आवारात व्यवसाय सल्लागार समितीची बैठक झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह संसदीय कामकाज मंत्री उपस्थित होते.
हिवाळी अधिवेश तीन आठवळे चालण्याची शक्यता
हिवाळी अधिवेश नासंदर्भात आज झालेल्या बैठकीत ८ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी हिवाळी अधिवेशन तीन आठवड्यांचे असू शकते. हे अधिवेशन ८ डिसेंबर ते २६ डिसेंबर पर्यंत चालेल. हे लक्षात घ्यावे की शेवटच्या दोन सत्रांमध्ये हिवाळी अधिवेशन तीन आठवड्यांसाठी आयोजित केले जात आहे.