नातेवाईकांनीच केली तब्बल १.२८ कोटींची फसवणूक; हुडकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अध्यक्षपद, उपाध्यक्षपद व नोकरीचे आमिष दाखवून महिलेला गंडवले; आरोपींपैकी एक सख्खा मामा

नागपूर : नोकरी आणि पद देण्याच्या आमिषाने तब्बल ₹1.28 कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. या प्रकरणात नागपूरच्या सौ. भारती संजय हरकंडे (वय ५०) यांनी तक्रार दिली असून, पाच आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींपैकी एक फिर्यादीचे नातेवाईक म्हणजेच मामा आहेत. आरोपीचे नाव निळकंठ दशरथ दहीकर (वय ६०), रा. देसाईगंज, गडचिरोली, सविता निळकंठ दहीकर (वय ५२),आशु निळकंठ दहीकर (वय ३०),राहुल धनोजी दहीकर (वय ३५),गुलाब धोंडबा दहीकर (वय ४५) — सर्व रा. देसाईगंज, वळसा, जि. गडचिरोली असे आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार देसाईगंज येथील “शांतीवन अपंग निराधार आदिवासी विकास शिक्षण संस्था” या संस्थेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद तसेच नोकरी लावून देतो असे सांगत फिर्यादीकडून विविध कालावधीत १.२८ कोटी रुपये घेतले.अध्यक्ष पदासाठी – ₹48,00,000 पतीस नोकरीसाठी – ₹15,00,000बहिणीच्या पतीसाठी – ₹45,00,000अन्य नातेवाईकांसाठी – उर्वरित रक्कम घेतली
मात्र कोणालाही नोकरी न लावता आरोपींनी रक्कम अपहार केला. पैसे मागितल्यावर फिर्यादीस ₹48 लाखाचा चेक देण्यात आला, तो देखील बाऊंस झाला.या प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे आरोपींविरुद्ध विविध कलामातर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.