निकृष्ट जेवणामुळे आमदार संजय गायकवाड संतापले, कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये राडा केल्याचा व्हिडीओ समोर आला. आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळं जेवण दिल्याच्या कारणावरुन संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. या दरम्यानचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
आमदार वसतिगृहात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन ऑपरेटरला मारहाण केल्याचंही यावेळी दिसून आलं. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवले होते, पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आला. डाळाची दुर्गंधी पाहून संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन ऑपरेटरला याबाबत विचारणा केली, त्याचबरोबर यावेळी त्यांनी कोणीही बील देऊ नका असंही सांगितलं, त्याचबरोबर बील काऊंंटरवरती बसलेल्या ऑपरेटरच्या कानशिलात देखील लगावली. या घटनेचा आणि गोंधळाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.