महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
पंढरपूर वरून वारकऱ्यांना घेऊन परतणाऱ्या एसटी बसचा अपघात: 10 ते 15 वारकरी जखमी

- बुलढाणा – पंढरपूर वरून परतणाऱ्या एसटी बसचा आज रात्री दोन वाजता भीषण अपघात झाला. एसटी बस डिव्हायडरला धडकून पलटली. अपघातात बस क्षतिग्रस्त झाली आहे. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये पांडुरंगाच्या दर्शनाहून परतणारे 52 वारकरी होते. एम एच 40, वाय 5830 क्रमांकाची खामगाव आगाराची बस पंढरपूर वरून येत होती. रात्री दोन वाजेच्या सुमारास मेहकर फाटा ते चिखली दरम्यान असलेल्या महाबीज कार्यालयासमोर बस डिव्हायडरला धडकली. या धडकेनंतर बस रस्त्यात पलटली. अपघातात बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र, 10 ते 15 वारकरी जखमी झालेत. त्यातील काहींना चिखली तर काहींना बुलढाणा रुग्णालयात हलवण्यात आले. चिखली पोलिसांनी घटनास्थळी दाखल घेत वाहतूक सुरळीत केली.