पाऊसा संदर्भात हवामान विभागाचा इशारा: येत्या २४ तासात विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

नागपूर:-प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर केंद्राच्या वतीने येत्या २४ तासात विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यानुसार रात्रभर पावसाने विदर्भातील अनेक शहरांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. हवामान विभागाने
गोंदिया,चंद्रपूर आणि गडचिरोली ला पावसाचा ”रेड”अलर्ट दिला देण्यात आलाय तर भंडारासह नागपूर वर्धा व अमरावतीसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आलाय.
रात्रीपासूनच पूर्व विदर्भातील जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. नागपूर,चंद्रपूर,भंडारा,वर्धा गडचिरोली,गोंदिया,यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात पावसाची संततधार कायम बघायला मिळत आहे. आज सकाळ पासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे नागपुरच्या सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या पाण्याचा निचरा होत असल्याने आद्यप तरी नागरिकांच्या तक्रारी पुढे आल्या नसलेल्या तरी देखील महानगरपालिका ,अलर्ट मोड’ वर आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा:-
गेल्या काही दिवसांपासून अतिशय संथ गतीने वाटचाल करत असलेल्या पावसाला आता गती मिळालीय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा तयार झाल्याने नागपूरसह विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे.