प्रेमसंबंधातून प्रेयसीच्या जिजावर जीवघेणा हल्ला; दिघोरीत रात्री चाकूने वार करून हत्या करण्याचा प्रयत्न!

नागपूर – काल रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दिघोरी, जुनी वस्ती, उमरेड रोड परिसरात प्रेमसंबंधातून एक धक्कादायक प्रकार घडला. आशिष हर्षे (रा. जयताळा) या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष हर्षे याची साली महेश काळे आणि अनुराग ढोक या दोघांसोबत मैत्री करत होती. यामुळे अस्वस्थ झालेल्या आशिषने या दोघांना समजावण्यासाठी दिघोरी परिसरात गाठले. मात्र समजावण्याच्या प्रयत्नातच वाद विकोपाला गेला आणि आरोपी महेश काळे व अनुराग ढोक यांनी आशिषच्या पोटात चाकू खुपसून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
हल्ल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून जखमी अवस्थेत आशिष हर्षे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलीसांनी तत्परता दाखवत दोन्ही आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.