महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
परिणय फुके यांच्या ताफ्यातील पोलीस वाहन आणि विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची धडक:अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू:

गोंदिया – माजी मंत्री तथा विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या ताफ्यातील पोलीस वाहन व विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकित धडक झाली यात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. अरविंद चव्हाण वय 36 रा. महाजन टोली असे मृतक तरुणाचे नाव आहे. तो गोंदिया कडून गोरगावकडे विरुद्ध दिशेने येत असताना परिणय फुके यांचा ताफा गोंदिया कडे जात असताना ताफ्यातील पोलीस वाहन व दुचाकीत जोरदार धडक झाली. यातच तो गंभीरित्या जखमी झाला असता परिणय फुके यांनी थांबून जखमीला ताफ्या तील गाडीत उपचाराकरिता गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविले असता मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. असून पुढील तपास गोरेगाव पोलिस करत आहे.