परिचारिका संघटनेच्या कामबंद आंदोलनाचा आज चौथा दिवस: शेकडो शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

नागपूर – सातव्या वेतन आयोगातील त्रुटी, कंत्राटी नर्सेसना कायम करण्याची मागणी आणि रिक्त पदांवर भरती करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने पुकारलेले बेमुदत कामबंद आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल), सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय (मेयो) येथील सैकडो परिचारिका या आंदोलनात सहभागी आहेत.
कामबंद आंदोलनामुळे रुग्णसेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली असून, अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामध्ये नेत्ररोग, कान-नाक-घसा (ENT), सामान्य शस्त्रक्रिया आणि आर्थोपेडिक विभागातील शस्त्रक्रिया विशेषत्वाने प्रभावित झाल्या आहेत.
नर्सेसच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
सातवा वेतन आयोग तातडीने व पूर्णतः लागू करावा, कंत्राटी नर्सेसना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करावे,रिक्त पदांवर स्थायी भरती करावी,…संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाने मागण्या मान्य केल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही. रुग्णांच्या सेवांवर होणारा परिणाम लक्षात घेता, शासनाने तातडीने चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी सर्वस्तरांतून होत आहे