प्रिया फुके यांचा विधानभवनाबाहेर आक्रोश; पोलिसांनी लहान मुलांसह घेतले ताब्यात

मुंबई – महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सोमवारी (७ जुलै) विधानभवनाबाहेर एक वेगळीच घटना घडली. भाजप आमदार परिणय फुके यांच्या विरोधात त्यांच्या भावजय प्रिया फुके यांनी थेट आंदोलन पुकारत सरकारकडे न्यायाची मागणी केली. यावेळी त्यांनी “मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेड द्यावं, आम्हाला न्याय द्यावा” अशी ठाम मागणी केली.
प्रिया फुके यांनी यापूर्वीही भाजप आमदार परिणय फुके यांच्याविरोधात गंभीर आरोप केले होते. या आरोपांना अनुसरूनच त्यांनी विधानभवनासमोर निदर्शनं केली. आंदोलनादरम्यान प्रिया फुके यांच्यासोबत त्यांची दोन लहान मुलंही उपस्थित होती. आंदोलनाची तीव्रता पाहून पोलिसांनी प्रिया फुके यांना ताब्यात घेतले, एवढेच नव्हे तर त्यांच्या लहान मुलांनाही पोलिसांनी गाडीत बसवून नेले.
प्रिया फुके यांच्या आंदोलनामुळे विधानभवनाबाहेर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या या कृतीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
प्रिया फुके यांनी आपल्या आंदोलनात स्पष्टपणे म्हटले की, “मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा. आम्हाला वेड द्यावा, आम्ही अन्यायाविरुद्ध लढा देत आहोत.”
या संपूर्ण प्रकारामुळे सरकारवर आणि पोलिस प्रशासनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. प्रिया फुके यांच्या या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.