“प्रवीण गायकवाड प्रकरणाशी भाजपचा काहीही संबंध नाही” – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा खुलासा
प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणावर स्पष्ट भूमिका

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत भाजपची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की,
“या हल्ल्याशी भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही. भाजपकडून अशा खालच्या पातळीवरच्या कृत्यांची परंपरा नाही. प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, हेच आमचं मत आहे.”
ते पुढे म्हणाले,
“प्रवीण गायकवाड भाजपचा कार्यकर्ता असला तरी त्याच्यावर अन्याय झाला असेल, तर पोलिसांनी कारवाई करावी. आरोपी कोणत्याही पक्षाचा असो – तो आरोपी आहे आणि कायद्यानुसारच वागावं लागेल.”
गायकवाड प्रकरण अस आहे कि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे शाई फासत धक्काबुक्की झाली. याप्रकरणी पोलिसांनी शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
दीपक काटे भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य सचिव असल्याचंही त्यांच्या सोशल मीडियावरून समोर येत आहे. प्रवीण गायकवाड यांनीही काटे भाजपचे कार्यकर्ते असल्याचं म्हटलं आहे.
प्रवीण गायकवाड अक्कलकोट येथील फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमातील सत्कार समारंभासाठी गेले होते. यावेळी तेथे जन्मेजयराजे भोसले हेही उपस्थित होते.
याच प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपची भूमिका नागपूर मध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली