महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

रामटेकमध्ये नाग-नागीण व २१ पिल्लांचा थरार! शेतातून पकडून जंगलात सोडले

नागपूर – जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील चाचेर गावात एका शेतात नाग-नागीण आणि त्यांच्या तब्बल २१ पिल्लांचा थरार पाहायला मिळाला. ही घटना स्थानिक शेतकरी नितेश ठोसरे यांच्या शेतात घडली आहे.

 

ठोसरे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत असताना, झोपडीत ठेवलेल्या औषधाच्या बोर्‍या हलवत होते. त्याचवेळी त्यांना एका बोरीखाली साप दिसला. त्यांनी तत्काळ ‘वाईल्ड चॅलेंजर’ संघटनेचे सर्पमित्र ऋषी बावणे यांना संपर्क केला. घटनास्थळी दाखल झालेल्या सर्पमित्रांनी जबरदस्त दक्षतेने एक साप पकडला.

 

मात्र, दुसरी बोरी हलवताना आणखी एक साप आणि काही पिल्ले दिसली. पाहता पाहता एकूण २३ साप (नाग, नागीण आणि २१ पिल्ले) पकडण्यात आली. ही सर्व सापांची कुटुंब वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली.

रामटेक वनविभागाचे रेंज अधिकारी राहुल शिंदे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर ‘वाईल्ड चॅलेंजर’चे सर्पमित्र अजय मेहरकुळे, सागर घावडे, ऋषी बावणे, लकी मरसकोल्हे यांच्या सहकार्याने सर्व सापांना चोरबावली जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

 

या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली होती. मात्र वनविभाग आणि सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे साप सुरक्षितपणे जंगलात सोडले गेले, हे विशेष!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button