महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
साऊथ ईस्ट सेन्ट्रल रेलवे मजदूर काँग्रेसचे सहावे द्विवार्षिक अधिवेशन नागपुरात उत्साहात पार

नागपूर – नागपूर विभागातील दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मजदूर काँग्रेस (एसईसीआरएमसी) च्या सहाव्या द्वैवार्षिक अधिवेशनाचे आज उद्घाटन झाले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय परिसरात असलेल्या गुंजन सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी एसईसीआरएमसीचे झोनल सरचिटणीस #पितांबर_लक्ष्मीनारायण अध्यक्ष होते, तर एसईसीआर प्रशासनाच्या वतीने #आदित्य_कुमार (पीसीपीओ/एसईसीआर), विभागीय रेल्वे व्यवस्थापक #दीपक_कुमार_गुप्ता, सीपीएम ए.के. सूर्यवंशी, एस.आर. मिश्रा, डॉ. प्रवीण बाजपेयी, अशोक शर्मा, अतिरिक्त संयुक्त सचिव देवाशिष घोष आणि अधिवेशनाचे मुख्य विभागीय समन्वयक इंदल दमाहे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.