महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

परभणी : परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला असून या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांकडून सुरूवातीपासूनच केला जातोय. परभणीच्या नवामोंढा पोलीस ठाण्यात सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. हा 451 पानांचा गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर केला. आता थेट संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.