सराईत गुंड संदीप पोन्हालेवर MPDA अंतर्गत कारवाई:मानकापूर पोलिसांची मोठी कारवाई

नागपूर – शहरातील गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला सराईत गुन्हेगार संदीप उर्फ संदीप जगदीश पोन्हाले (वय २२, रा. प्लॉट नं. ५५, झिंगाबाई टाकळी) याच्यावर मानकापूर पोलिसांनी मोका (MPDA) कायद्यान्वये कारवाई केली असून त्याची थेट कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
संदीप पोन्हाले हा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असून जबरदस्तीने खंडणी उकळणे, मारहाण करणे, धारदार शस्त्राने हल्ले करणे, रस्त्यात अडवून लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे त्याच्या विरुद्ध नागपूर शहरातील मानकापूर, गिट्टीखदान, कोराडी पोलीस ठाण्यांत नोंदवले गेले आहेत.
त्याच्याविरुद्ध २०२१ व २०२३ मध्ये पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्याने गुन्हेगारी वर्तणूक कायम ठेवत स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार केले होते. याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मानकापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक पो. नि. शैलेश आहेर यांनी MPDA कायद्याअंतर्गत प्रस्ताव सादर केला होता, ज्यास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मान्यता दिली.
दिनांक ३० जुलै २०२५ रोजी आरोपी संदीप पोन्हाले याला अटक करून थेट नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले.
या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.