सरकारी वसतिगृहात मध्यरात्री मुलीचा विनयभंग; नागपूरच्या सुरक्षेवर गंभीर सवाल!”
वसतिगृहात सीसीटीव्हीशिवाय मुली असुरक्षित

नागपूर – नागपूर शहरातील एका शासकीय ओबीसी मुलींच्या वसतिगृहात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दोन अज्ञात आरोपींनी २२ जुलैच्या रात्री ३ वाजता वसतिगृहात घुसून एका विद्यार्थिनीच्या खोलीचे दार तोडून तिचा विनयभंग केला आणि तिचा मोबाईल हिसकावून फरार झाले.
या घटनेनंतर वसतिगृहात राहणाऱ्या इतर विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे, या वसतिगृहात सीसीटीव्ही यंत्रणा नाही आणि ना कोणतीही सुरक्षारक्षकांची व्यवस्था. यामुळे मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
पीडित मुलीच्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, आरोपी अजूनही फरार आहेत.
पीडित मुलीच्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, आरोपी अजूनही फरार आहेत.
वसतिगृहात एकूण ६४ मुली राहत असून अशा स्थितीत सुरक्षेचा अभाव हा अत्यंत चिंतेचा विषय ठरत आहे. या घटनेमुळे नागपूरच्या महिला सुरक्षेविषयीची स्थिती आणि शासकीय यंत्रणांची निष्क्रियता पुन्हा एकदा उघड झाली आहे.