तलावात बुडून 18 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
रामटेकच्या अंबाला तलावतील दुर्दैवी घटना

तलावात बुडून 18 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
नागपूर जिल्ह्याच्या रामटेक शहरालगत सुप्रसिद्ध असलेल्या अंबाळा तलावात आज दुपारी एक वाजता चा दरम्यान सुजल लिखित पटले वय 18 वर्ष राहणार कटोरी मानेगाव तह खैरलांजी जिल्हा बालाघाट याचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला
मिळालेल्या माहीतीनुसार सुजल चे वडील यांच्या मावशी चे अस्थि विसर्जन करण्याकरता सर्व परिवार रामटेक अंबाळा येथे आले होते काहीजण आंघोळी करता पाण्यात उतरले असता त्यात सुजल सुद्धा गेला होता तो तलावाच्या पायरी उतरता उतरता त्याच्या पाय खोल पाण्यात गेला व पाण्याच्या अंदाज नसल्यामुळे तो बुडायला लागला लोकांनी आरडाओरडा केली पण त्यांना वेळेस कोणती मदत मिळाली नसल्यामुळे सुजलच्या मृत्यू झाला काही वेळांनी रामटेक पोलिसांना माहिती देण्यात आली रामटेक पोलिसांनी तत्काळ एचडीआरएफ टीमला माहिती दिली ते येईपर्यंत स्थानिक नागरिकांनी मृतदेह बाहेर काढला व पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह इच्छिदनासाठी करण्याकरता रामटेक रुग्णालयात पाठवण्यात आले व पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे