उद्घाटनाच्या आधीच रेल्वेस्थानकावरील तिकीट घराचे कोसळले शेड: बडनेरा रेल्वेस्टेशनवर ‘अमृत’ योजनेंतर्गत साकारले होते शेड

अमरावती – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते अमृत भारत स्टेशन योजनेतर्गत देशभरातील १०३ स्थानकांचे उद्घाटन करण्यात आले. मात्र बडनेरा रेल्वेस्थानकावर उद्घाटनाच्या आधीच या विकासकामातील निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचार उघड झाला. स्थानकावर नव्याने उभारण्यात आलेल्या तिकीट घराच्या मुख्य प्रवेशदारासमोरील शेड कोसळले आहे. त्यामुळे कामे सुरू असताना नव्याने बांधण्यात आलेल्या तिकीट आरक्षण कक्षाच्या छताचे पीओपी उद्घाटनाआधीच कोसळल्याने खळबळ उडाली आहे. अवध्या २५ दिवसांपूर्वी लावण्यात आलेली पीओपी आता पावसाळ्यातल्या पाण्यापुढे टिकले नाही.
अमृत महोत्सव दोन योजनेंतर्गत बडनेरा
स्टेशनवर प्रवाशांसाठी अद्ययावत तिकीट आरक्षण कक्ष उभारण्यात येत आहे. हे काम अद्याप पूर्ण झाले नसतानाच छताचा भाग कोसळल्याने दर्जेदार कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. उद्घाटन झाले असते आणि तेव्हा ही दुर्घटना घडली असती, तर प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता.
या प्रकारामुळे रेल्वे प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांच्या हलगर्जी कारभारावर नागरिक संतप्त आहेत. ‘ज्यांना प्रवाशांच्या सुरक्षेचे भान नाही, ते विकासाच्या नावाखाली निधीचा वापर कसा करतात?’ असा सवाल प्रवासी करत आहेत कक्षासारख्या महत्त्वाच्या सुविधेच्या बांधकामात घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.