महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

वाडी पोलिसांची कारवाई — ५.०३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखू जप्त; एक अटक

नागपूर – वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची तस्करी उघडकीस आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे वाडी पोलिसांनी खडगाव रोडवरील अराको गोदामाजवळ छापा टाकत महिंद्रा मॅक्सीमो (क्रमांक M40 Y2303) वाहनाची तपासणी केली.

तपासणीदरम्यान चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी संशयावरून वाहनाची झडती घेतली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाला साठवलेला आढळून आला.

घटनास्थळी बोलावण्यात आलेल्या अन्न सुरक्षा अधिकारी किरण गेडाम यांनी जब्त केलेल्या मालाची एकूण किंमत ₹३,५३,००० इतकी असल्याचे स्पष्ट केले, तर वाहनाची किंमत ₹१,५०,००० असल्याने एकूण मुद्देमालाची किंमत ₹५,०३,००० इतकी होते.

पोलिसांनी अब्दुल गफ्फार अब्दुल जब्बार शेख (वय ५०, रा. दत्तवाडी) या आरोपीला अटक केली आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल धुरट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या कारवाईमुळे वाडी परिसरात गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली असून पोलीस यापुढेही अशा प्रकारच्या तस्करीवर कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button