वंचितांची सेवा, हीच खरी समाजसेवा -डॉ मोतीलाल चौधरी
माई फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण व आरोग्य शिबीरा ला प्रचंड प्रतिसाद

नागपूर : माई फाउंडेशन आणि माई ग्रुप चे संस्थापक डॉ. मोतीलाल चौधरी यांच्या वाढदिवसा निमित्ताने आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या ७ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त वृक्षारोपण आणि बहुउद्देशीय आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. वर्धा रोडवरील पंजरी येथे २०० रोपे लावण्यात आली. आणि त्याच दिवशी मनीष नगर कार्यालयात बीपी, शुगर, ईसीजी, नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप, रक्तदान आणि दंत उपचार यासारख्या सेवा देण्यात आल्या. त्याप्रसंगी सुमारे ४०० नागरिकांनी लाभ घेतला आणि २५ जणांनी रक्तदान केले, व ८० लोकांना मोफत चश्मे वितरण करण्यात आले.
डॉ. चौधरी यांनी १९९५ पासून दरवर्षी रक्तदान करण्याची परंपरा शुरू ठेवली आहे. अनेक गरजूंना रक्तांची गरज असताना असे किती तरी वंचित कुटुंबे आहेत, जे दुःख असूनही डॉक्टरांच्या उपचारांवर पैसे खर्च करू शकत नाहीत, अशा अनेक कुटुंबांना या शिबिराचा फायदा झाला आहे ! खऱ्या अर्थाने, वंचितांची सेवा करणे, हीच खरी ईश्वरसेवा आहे. असे यावेळी डॉ. मोतीलाल चौधरी यांनी उद्गार काढले.
या कार्यक्रमात अनेक सामाजिक आणि राजकीय मान्यवर उपस्थित होते. त्यात मा अतुल लोंढ़े कांग्रेस प्रवक्ता,माई फाउंडेशन च्या सचिव रूबी चौधरी, अहिप चे अनुप जायसवाल, योगेश गायकवाड, प्रसाद आणि इतर मान्यवर उपस्थित होते.यशस्वीतेसाठी प्रकाश बघेले,निलेश बोपचे, जैलाल पटले, श्रीकृष्ण तळेगावकर, हिरालाल पराडकर, राम कुशवाह, दीपक भावसार, मुन्ना पटले, श्रीराम मुडे, किशोर नागदिवे, सूर्यकांत राजे, राहुल क्षिरसागर,श्रीपद दखने,अनिल बन्नोरे,आणि नेहा श्रीवास्तव यांनी अथक परिश्रम घेतलेत. तसेच डॉ. चौधरी यांनी सर्व डॉक्टर्स कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.