महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
वीज कंपन्यांचे खाजगीकरण हे आरक्षण संपविण्याचे षडयंत्र – डॉ. नितीन राऊत
अदानी-टोरंट पॉवरला वीज वितरण देण्याच्या निर्णयाचा विरोध; वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या मागण्या सभागृहात लावून धरल्या

मुंबई – राज्यातील वीज कंपन्यांमधील कर्मचारी, अभियंते आणि कामगार यांच्या कृती समितीने विद्युत क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात आज संप पुकारला आहे. महायुती सरकारच्या काळात खासगीकरणाचा सपाटा सुरू झाला आहे. आरक्षण संपवण्याचा खेळ गेल्या काही वर्षापासून सुरूच आहे. महावितरण कंपनी अदाणी व टोरेंट कंपनीच्या घशात घालण्यासाठी खाजगीकरण करून आरक्षण संपवायला दिलेली चाल आहे. हे या सरकारचे एक षडयंत्र असल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत बोलताना केले आहे.